मोठी बातमी ! नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-काँग्रेसनेते विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सादर केला.

राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. लवकरच काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News