मोठी बातमी! PUBG ची भारतात पुन्हा एन्ट्री होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- पबजी मोबाईल भारतात परत येणार आहे. दक्षिण कोरियन कंपनी पबजी कॉर्पोरेशननं याबद्दलची घोषणा केली आहे. PUBG मोबाइल इंडिया नावाच्या खेळाच्या नव्या आवृत्तीवर काम सुरू आहे.

PUBG कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे की, PUBG मोबाईल इंडिया खास भारतीय बाजारासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये डेटा गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे.

पबजी कॉर्पोरेशनची मालकी असलेली क्राफ्टॉन भारतात 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स, मनोरंजन आणि आयटी उद्योगात कंपनी प्रामुख्यानं गुंतवणूक करेल, असं कंपनीनं सांगितलं आहे.

दक्षिण कोरियन कंपनीकडून करण्यात येणारी ही भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक असेल, असा कंपनीचा दावा आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन मोदी सरकारनं पबजीवर बंदी घातली.

पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळेच पुन्हा भारतात येताना क्राफ्टॉननं चिनी कंपनी टेन्सेंटची मदत घेतलेली नाही.

मात्र इतर देशांमध्ये क्राफ्टॉन टेन्सेंटसोबत काम करत राहणार आहे. PUBG Corporation ने असेही जाहीर केले आहे की, कंपनी प्लेयर्सशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी भारतात एक उप-सहायक कंपनी तयार करेल.

भारतामध्ये पब्जीचे 100 कर्मचारी असतील. यासाठी स्थानिक कार्यालये तयार केली जातील आणि स्थानिक व्यवसायाच्या निमित्ताने कंपनी येथे गेमिंग सेवा चालवेल. दरम्यान हा गेम भारतामध्ये कधी सादर केला जाईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment