मोठी बातमी : सत्यजित तांबे होणार आमदार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार आहे. खरंतर या जागांवर जूनमध्येच निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली.

मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा तर राष्ट्रवादीकडूनही 4 नावे चर्चेत आहेत.

काँग्रेसच्या गोटामधून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतेय.

त्याबरोबरच नसीम खान, रजनी पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा आहे. परंतु सत्यजित तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब हे फायनल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

सत्यजित तांबे यांनी 2014 साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे.

गेल्या दीड दशकांपासून तांबे यांनी युवक काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचं काम केलं आहे. तसंच जयहिंद युवा मंचाद्वारे तांबे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

राष्ट्रवादीकडून ‘ही’ नावे चर्चेत :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील चार नावं समोर आली आहे. त्यात भाजपमधील नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचंही नाव चर्चेत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावालाही पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांची नावही चर्चेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment