बीएसएनएलची सणांच्या मुहूर्तावर खास ऑफर, ‘ह्या’ योजनांवर मिळतिये एक्स्ट्रा व्हॅलिडिटी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सणाच्या हंगामापूर्वी काही प्लॅन व्हाउचर (पीव्ही) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (एसटीव्ही) वर एक्स्ट्रा व्हॅलिडिटीची ऑफर घेऊन आली आहे.

बीएसएनएलने चेन्नईच्या परिपत्रकाद्वारे ही ऑफर जाहीर केली असून ही प्रमोशनल फेस्टिव ऑफर 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल असे नमूद केले आहे. जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल –

1) 147 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :- या प्रीपेड योजनेत या ऑफरअंतर्गत पाच दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळत आहे. पूर्वी ही योजना 30 दिवसांच्या वैधतेसह येत होती. परंतु आता ऑफर अंतर्गत या योजनेला आता 35 दिवसांची वैधता मिळेल. ही योजना 250 मिनिटांच्या FUP मर्यादेसह अमर्यादित विनामूल्य व्हॉईस कॉल ऑफर करते. तसेच, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध असतो. या योजनेत आपल्याला दररोज 100 एसएमएस आणि EROS Now एंटरटेनमेंट सर्विस देखील मिळेल.

2 ) 247 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :- या प्रीपेड योजनेत 10 दिवसांची अतिरिक्त वैधता देण्यात आली आहे. पूर्वी ही योजना 30 दिवसांची वैधता घेऊन येत होती, परंतु आता आपल्याला 40 दिवसांची वैधता मिळेल. ही योजना 250 मिनिटांच्या FUP मर्यादेसह अमर्यादित विनामूल्य व्हॉईस कॉल ऑफर करते. तसेच, 3 जीबी हाय स्पीड डेटा देखील दररोज उपलब्ध असतो. योजनेत आपल्याला दररोज 100 एसएमएस आणि EROS Now एंटरटेनमेंट सर्विस देखील मिळेल.

3 ) 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन :- 699 रुपयांच्या योजनेला 20 दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जात आहे. पूर्वी या योजनेची वैधता 160 दिवसांची होती. यात असीमित विनामूल्य व्हॉईस कॉलसह 250 मिनिटांची एफयूपी मर्यादा, अमर्यादित विनामूल्य डेटा (500 एमबी नंतर त्याची गती 80 केबीपीएसवर येईल), 100 विनामूल्य एसएमएस आणि विनामूल्य पीआरबीटी सेवा दिली जाते. आता हे सर्व फायदे 180 दिवसांपर्यंत मिळतील.

4 ) 1999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन  :- 1999 रुपयांचे व्हाउचर ही एक वार्षिक योजना आहे. यात अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल, दररोज 100 एसएमएस, 3 जीबी हाय स्पीड डेटा समाविष्ट आहे. या योजनेची प्रथम वैधता 365 दिवस होती. या योजनेची वैधता 60 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. तर आपल्याला हे सर्व फायदे 425 दिवसांसाठी मिळतील. येथे आपल्याला 2 महिन्यांकरिता पीआरबीटीसह Eros Now एंटरटेनमेंट सर्विस मिळेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment