नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. यामुळे सण उत्सव साजऱ्या करण्याबाबत मुख्यमंत्र्यानी एक महत्वपूर्ण विधान केले आहे.

येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

गणपती उत्सवादरम्यान प्रशासनास ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल,

असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते. त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment