सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक पायाभूत प्रकल्प हे प्रस्तावित असून यामध्ये रस्ते तसेच रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. रस्ते आणि रेल्वे प्रकल्प जर मोठ्या प्रमाणावर विकसित झाले तर त्याचा थेट फायदा हा कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होतो तसेच मोठमोठी शहरे आणि ग्रामीण भागाची एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढण्यास देखील मदत होत असते.
अगदी याच प्रमाणे जर आपण पायाभूत प्रकल्पांच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये काही रेल्वे प्रकल्पांची मागणी किती वर्षापासून होत असून काही प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत व यामध्ये बारामती ते फलटण आणि मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गांचा समावेश आहे.
यामध्ये इंदोर आणि मनमाड रेल्वे मार्ग हा खूप महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश थेट एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या गेल्या कितेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली असून याचा थेट फायदा दोन्ही राज्यातील 1000 गावांना होणार आहे.
मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाला मंजुरी
मनमाड ते इंदोर रेल्वे मार्ग हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला मार्ग असून नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मार्गाला मंजुरी देण्यात आली असून याचा थेट फायदा आता 1000 गावांना होणार आहे. हा महामार्ग एकूण तीनशे नऊ किलोमीटरचा असून यावर एकूण 30 रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहेत.
जेव्हा हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास येईल तेव्हा मुंबई आणि इंदूर सारख्या ज्या काही उद्योग आहेत त्यामधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे व याचा थेट फायदा औद्योगिक विकासाला होणार आहे. साधारणपणे आता मंजुरी मिळाल्यानंतर 2028 ते 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे.
हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असून रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून देखील याचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहेत. मनमाड ते इंदोर दरम्यान बांधण्यात येणार्या या रेल्वे मार्गाला तब्बल 18 हजार 36 कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे.
काय होईल या रेल्वे मार्गाचा फायदा?
मनमाड ते इंदोर रेल्वे मार्ग झाल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. या दोन राज्यां दरम्यानची होणारी मालाची वाहतूक आणि प्रवासी वाहतूक यांना खूप मोठा फायदा होणार असून या तीनशे नऊ किलोमीटरच्या मार्गावर सहा जिल्हे येणार आहेत.
या जिल्ह्यांमधील देखील कनेक्टिव्हिटी वाढेल व विकासाला चालना मिळणार आहे. तसेच मध्य भारताचा पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भारताशी कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे पर्यटन देखील वाढण्यास मदत होणार आहे. सध्या ही लाईन सिंगल असून भविष्यामध्ये हा मार्ग दुहेरी लाईनचा करण्याचा सरकारचा प्लॅन आहे.
अध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितले तर उज्जैन येथील महाकाल मंदिरामध्ये जाणे देखील महाराष्ट्रातील भाविकांना यामुळे सहज होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तर याचा फायदा होईलच.
परंतु नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील शेतीमाल इंदोरला नेणे सोपे होणार आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर खते तसेच सिमेंट व स्टील, इंधन आणि तेल सारख्या उत्पादनाचे वाहतूक करणे देखील सोपे होणार आहे.