अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सरकारला सार्वजनिक कंपन्या विकू देणार नाही, त्यासाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही आक्रमक भूमिका जाहीर केली. कोविड काळात शेअर मार्केट खेळण्यासारखे झाले होते. आता शेअर मार्केट सावरले आहे.
सेन्सेक्स वाढला आहे. कारण केंद्राकडून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जाईल असे कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढली आहे.
मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत सरकारला पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असे आंबेडकरांनी सांगितले. केंद्र सरकारने कोव्हिडनंतर आपले पहिले बजेट सादर केले आहे.
सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत १९,७६,४२४ लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगले बजेट मांडलंय असे वाटत आहे.
पण वस्तुस्थिती वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोव्हिड काळात कामगार किंवा आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते.
लॉकडाऊनमुळे ज्यांचे पुनर्वसन झाले त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावे लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
चायनीज अॅप बंद करण्यास आमचा पाठिंबा आहे. इंग्लंडमध्येही कंपन्या विकण्याचा प्रयोग करण्यात आला. पण त्यांनी सरकारी कंपन्या विकल्या नाहीत,
आपल्याकडे मात्र सरकारी कंपन्या विकण्यावरच भर दिला जात आहे, असे सांगतानाच केंद्र सरकारचे धोरण झिंगलेल्या दारुड्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved