अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे अनेक महिला थेट टोकाचे पाऊल घेते आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडला आहे.
अनैतिक संबंधाबाबत आम्ही तुझी समाजात बदनामी करू अशी धमकी देऊन विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, मयत विवाहितेच्या पतीने राहाता पोलिसांत फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीत म्हंटले आहे की,
माझी पत्नी कामास असलेल्या ठिकाणच्या मालकाने व त्याच्याबरोबर काम करणार्या एका व्यक्तीने असे मिळून दोघांनी मला फसवले आहे.
मला सांगायला पण बरे वाटत नाही असे मला त्यावेळी पत्नीने सांगितले होते. त्यानंतर माझ्या कुटुंबातील एका नातेवाईक महिलेने माझ्या पत्नीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता पत्नीने झालेल्या फसवणुकीबद्दल माहिती दिली होती.
आरोपी विकी शंकर बाबर व संजय गणपत सदाफळ यांनी अनैतिक संबंध करून फसवणूक केल्याने माझ्या पत्नीच्या मनात नेहमी मला जगायचे नाही, माझी फसवणूक झाली असे विचार येत होते.
माझ्या पत्नीस आरोपी बाबर व सदाफळ यांनी दिलेल्या त्रासामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माझी खात्री झाली असून माझी त्यांच्याविरुद्ध फिर्याद आहे.
दोन्ही आरोपींनी धमकी देऊन तिच्याशी अनैतिक संबंध केल्याने तिची समाजात बदनामी होईल म्हणून तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
यावरून आरोपी बाबर व सदाफळ यांचे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved