अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.
“मी तुमच्या पाठीशी आहे ,काळजी करू नका” असा जो शब्द व विश्वास दिला होता तो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देऊन खरा करून दाखवला, अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घालत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्य सरकार ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाच्या अडचणीत तसेच आर्थिक स्रोत कमी झालेला असताना देखील त्यांनी धाडसी निर्णय घेत मोठी मदत जाहीर केली आहे. महाविकास आघाडी सरकार यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, असेही मंत्री गडाख म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved