अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्हा आणि रस्त्यावरील खड्डे हे जुने नाते आजही टिकून आहे. मात्र याच गोष्टीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे.
दरवर्षी खड्यांची संख्या वाढतच आहे, मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतेही ठोस उपायोजना केल्या जात नाही. यामुळे त्रासलेल्या नागरिकांडी पुढाकार घेऊन स्वतः श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कौतुकास्पद काम केले आहे.

दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, नेवासा ते शेवगाव हा महामार्ग सध्या खड्डयात गेलेला आहे.रस्त्यात मोठं मोठी खड्डे निर्माण झाल्याने याठिकाणी अनेकदा अपघात झाले आहे.
असाच प्रकार भेंडा बस स्थानक चौक ते मळीनाला दरम्यान रस्त्यात अनेक मोठं मोठी खड्डे पडलेली आहे.सध्या पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांचे तळे झाली आहेत .
खड्ड्यात पाणी साचलण्याने खड्डा किती मोठा आणि खोल आहे याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार त्या खड्ड्यात आढळून पडले आहेत .
हे खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने 2 महिन्यांपूर्वी बुजविली होती.मात्र ती पून्हा उखडली. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत होती.
हे पाहून भेंडा येथील सामाजीक कार्यकर्ते रामदास वाघमारे यांच्यासह काही नागरिकांनी स्वतःच खोरे – घमेले हाती घेऊन खड्डे बुजविली.तब्बल एक तास श्रमदान करून त्यांनी ही खड्डे बुजविली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved