अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे गेले अनेक महिने राज्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात येत असून हळूहळू सर्वसेवा पुर्वव्रत होत आहे.
मात्र अद्यापही अनेक पर्यटनस्थळे बंदच आहे. दरम्यान नगरकरांनो फिरायला बाहेर जाण्याचा बेत आखणार असाल तर जराशी काळजी घ्या, कारण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरोनाच्या नियमांमुळे पर्यटन स्थळे बंद असली तरी सध्या अनेकजण डोंगर, नद्या, टेकड्यांवर जायचे प्लॅन करत आहे. जास्तीच्या पावसामुळे नगर जिल्ह्यातील नदी, तलाव भरले आहेत.
सगळीकडे हिरवाई दाटली आहे. अशा स्थितीत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी अनेकजण डोंगर, टेकड्यांवर जाऊन निसर्गाचा आनंद लुटतात. अनेकांनी प्लॅन आखले मात्र या प्लॅनवर पाणी फिरले.
कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात देखील पावसाने पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. एकीकडे परतीचा पाऊस सुरू झाला आहे.
तसेच गेल्या दोन दिवसांपासून हवामान खात्याने जोरदार पावसाचा पुन्हा इशारा दिला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे.
व या चक्रीवादळाचा मार्ग हा नगर जिल्ह्यातून असल्याने परतीचा पाऊस आणखी किती मोठा असेल हेही सध्या सांगणे कठीण आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना एक दिलासा मिळत असताना जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा कोरोना पसरण्याची भिती निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved