आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या दहशती पुढे काँग्रेस कदापि झुकणार नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील भळगट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करण्याचं काम केलेला राष्ट्रवादी आमदार संग्राम अरुण जगताप याचा कार्यकर्ता, तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक हल्ल्यातील आरोपी अंकुश मोहिते याने आज जाणीवपूर्वक माझ्यावरती षड्यंत्र रचत नियोजनबद्धरीत्या बनाव निर्माण करत नगर शहरात महसूल मंत्री तथा प्रांताध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करायची धमकी देत काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर रचलेला डाव काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावला.

घडलेल्या घटनेबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अंकुश मोहिते सह दोन अज्ञात गुंडा विरुद्ध रात्री फिर्याद दिली. यावेळी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे,

विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप हा त्याच्या कार्यकर्त्यांना पुढे करत काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षवर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आटापिटा करत आहे.

वास्तविक पाहता लोकप्रतिनिधीनी समाजामध्ये अशी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी काम करायचे असते. परंतु गेली अनेक वर्ष खोट्या केसेस करणे हेच काम करण्याचं काम ज्या संग्राम जगतापनी केलं त्याच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा बाळगण्याचे काही कारण नाही, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

माझ्यावरती हा प्रयोग करण्यापूर्वी भळगट प्रकरणामध्ये भळगट कुटुंबियातील पुरुष सदस्य, तसेच महिला भगिनींच्या वरती झालेल्या अन्यायकारक प्रसंगात मदतीला धावून जाणारे या शहरातील वंदनीय असणारे स्वर्गीय सुवालालजी गुंदेचा यांचे चिरंजीव आणि काँग्रेस पक्षाचे नगर शहरातील नेते मनोज गुंदेचा यांच्यावर देखील खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही की काय म्हणून आज दुसरा अध्याय घडवत माझ्यावरती हा प्रयोग करण्यात आला.

भळगट कुटुंबीयांसमवेत घडलेली घटना ही उत्तर प्रदेशात हाथरस मधील आपल्या दलित भगिनी सोबत घडलेल्या घटने एवढीच गंभीर

या दोन्ही प्रकरणातही गांभीर्य तेवढेच विदारक आहे.आदरणीय राहुल गांधीजी, प्रियांका गांधीजी हे हाथरस प्रकरणातील पिडीत दलित भगिनीसाठी उत्तर प्रदेशला धावून गेले. त्याच विचारावर चालत नगर शहरातील व्यापारी आणि महिला भगिनी वरती झालेल्या अन्यायाच्या प्रसंगांमध्ये त्यांच्या मदतीला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी धावून गेलो.

याचा या गुंड टोळीच्या पोटामध्ये पोटशूळ उठला असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे. नगर शहरातील काँग्रेस पक्षाला नमवण्यासाठी, किरण काळेला षड्यंत्र करत अडकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देखील मी संग्राम अरुण जगताप याच्या दहशतीमुळे कदापि झुकणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

अंकुश मोहिते आणि गॅंगनी आमदार संग्राम जगताप याच्या सांगण्यावरूनच काँग्रेस कमिटीच्या कार्यालयवरती पाळत ठेवत माझा माग काढत त्याठिकाणी जाणीवपूर्वक पार्किंगच्या पैसे मागण्या वरून वाद निर्माण केला. वास्तविक पाहता पार्किंगचे पैसे देऊन मी रीतसर पावती देखील त्यांच्याकडून घेतलेली होती.

असे असतानासुद्धा त्या ठिकाणी बनाव रचत वाद उभा केला गेला. मला चहूबाजूनी घेरण्याचा प्रयत्न केला गेला. वास्तविक पाहता मी ज्यावेळी संबंधित इसमाकडे ओळख पत्राची मागणी केली त्यावेळी ते दाखवण्या ऐवजी त्यानी मला शिवीगाळ सुरू केली. तु आमच्या संग्राम भैया जगताप यांना नडतो. तुझ्याकड बघतोच आता.तुझा कार्यक्रम करून टाकतो,

असं म्हणत मला धमकावलं. खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा तुझ्यावर टाकू असं म्हणत मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी अजिबात डगमगलो नाही आणि डगमगणार ही नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. आजवर मी या शहरामध्ये अन्यायाच्या विरुद्ध कायम संघर्ष केलेला आहे. आणि उद्याही करत राहणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment