अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील भाजप सरकारने आणलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन आणखी तीव्र केलं आहे.
या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 31 ऑक्टोबरला राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिन तसेच
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत या दिवशी राज्यभरात किसान अधिकार दिवस पाळला जाणार असून, या काळ्या कायद्यांविरोधात सत्याग्रह करण्यात येणार आहे,
अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले,
‘केंद्र सरकारने विरोधी पक्षांची मतं विचारात न घेता पाशवी बहुमताच्या जोरावर हे कायदे मंजूर करुन घेतलेत. या कायद्यांमुळे उद्योपतींचं हित होणार असून शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे.’ शेतकऱ्याला या कायद्याच्या माध्यमातून उद्योगपतींचा गुलाम बनवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून हे काळे कायदे रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचंही थोरात यांनी सांगितलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved