अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-बहुप्रतिक्षित असलेल्या अशोकनगर कारेगाव रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील कारेगाव तसेच इतर 4-5 गावांना श्रीरामपूरला जाण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असून त्या रस्त्याने वाहतुकीस व दळणवळणास नागरिकांना अतिशय अडचण होत होती.
या गोष्टीची दाखल घेत सभापती दिपक पटारे यांनी पाठपुरावा करून खा. लोखंडे यांच्या विकास निधीतून हा रस्ता मंजूर करून घेतला व रस्त्याच्या भूमिपूजनास स्वतः खासदारांना बोलावून त्यांच्या हस्तेच भूमिपूजन केले.
खा. श्री.सदाशिव लोखंडे यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या अशोकनगर ते कारेगाव रस्त्याचे कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी माजी सभापती दिपक पटारे, जिल्हा परिषद सदस्या संगीता गांगुर्डे,
अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, शिवसेनेचे राजेंद्र देवकर, भाजपा भटक्या विमुक्त जाती सेल जिल्हाध्यक्ष विठ्ठल राऊत, सुधीर वायखेंडे, लक्ष्मणराव भवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार लोखंडे म्हणाले कि, श्रीरामपूर तालुक्यातील रस्ते आरोग्य सेवा व नागरिकांच्या मुलभूत सोयीकरिता योग्य तो निधी, देवून लोकांच्या अपेक्षेला खरे उतरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन.
तसेच पुढील कालावधीमध्ये सर्व गावांना भेटी देवून नागरिकाच्या समस्या समजून घेवून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन, अशी ग्वाही खा. सदाशिव लोखंडे यांनी बोलताना दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved