राठोड यांच्या बदलीबद्दल उलटसुलट चर्चा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-आठ दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्याला लाभलेले अितरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची तडकाफडकी जिल्ह्यातून बदली करण्यात आल्याने त्यांच्या पाथर्डी तालुक्यात मात्र या बदलीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अतरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. राठोड नगरला बदली होऊन आल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, शिरापूर, पाथर्डी शहर येथे त्यांच्या समर्थकांकडून मोठी बॅनरबाजी करत त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.

त्याच बरोबर तालुक्यातील अनेक गावात त्यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले. असे असताना अचानक त्यांची या पदावरून उचलबांगडी झाल्यामुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेवासे येथील एका पोलिस कर्मचाऱ्या बरोबर संभाषण करतानाही त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. डॉ राठोड यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण काय याचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

असे असले तरी पाथर्डी तालुक्यातील विशेषतः तिसगाव परिसरात त्यांच्या समर्थकांचा मात्र राठोड यांच्या तडकाफडकी बदलीमुळे मोठा हिरमोड झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment