अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घेतला आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यातच पारनेर तालुक्यात एका ठिकाणी विजेचा शॉक लागून एक गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीच्या आर्थिंगचा धक्का बसून पारनेर तालुक्यातील शहंजापूर येथे संकरीत गायीचा मृत्यू झाला.
महावितरणकडून या गायीची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी रविंद्र भागचंद म्हस्के यांनी केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, बुधवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
वेळोवेळी विजपुरवठा ट्रिप होत असतानाच मुख्य विज वाहिनीच्या आर्थिगचा म्हस्के यांच्या संकरीत गाईस झटका बसला. त्यात गायीचा जागीच मृत्यू झाला.
म्हस्के यांनी सुपे येथील महावितरणच्या कार्यालयात जाउन झालेल्या दुर्घटनेची माहीती दिली. परंतू तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महावितरणच्या हालगर्जीपणामुळे गायीचा शॉक बसून मृत्यू झाल्याने या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने तात्काळ या दुर्घटनेचा पंचनामा करून शेतक-यास मदत दयावी
अन्यथा महावितरणच्या कार्यालयात जाउन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved