अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- तलाठी भरतीसाठी पावणेदोन वर्षांपूर्वी झालेल्या परीक्षेत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सर्वजण वेगवेगळ्या आठ जिल्ह्यांतील आहेत. याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील ८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान ॲानलाइन परीक्षा घेण्यात आली होती.
अनेक उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ॲानलाइन दिली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारूप यादी प्रशासनाने जाहीर केली.
त्या उमेदवारांना ३ ते ७ जानेवारी दरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो व प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
त्यात तब्बल११ उमेदवार डमी आढळले. यासंदर्भात आता जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या सूचनेवरून सामान्य प्रशासनच्या तहसीलदार माधुरी आंधळे
यांनी नुकतीच कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून त्या ११ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्वजण उमेदवार भंडारा, गडचिरोली, धुळे, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|