DA Hike News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ व फरक मिळेल ‘या’ महिन्याच्या पगारासोबत! शासन निर्णय निर्गमित

Published on -

DA Hike News:- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये गेल्या काही दिवसां अगोदर चार टक्क्यांची वाढ केली. या अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत होता व आता 4% वाढीसह महागाई भत्ता हा 46% इतका झाला आहे.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केलेली ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. अगदी याच पद्धतीने राज्य सरकारने देखील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत तो 46% केला आहे.

तसेच ही वाढ एक जुलै 2023 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात आलेली आहे. यासंबंधीचाच एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे व त्यासंबंधीचीच माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

 महागाई भत्ता वाढ आणि फरक कर्मचाऱ्यांना मिळेल डिसेंबर महिन्याच्या पगारात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करत तो 46 टक्के इतका केला आहे. ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबर 2023 या महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना देण्यात यावा अशा पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता.

परंतु हा निर्णय येईपर्यंत नोव्हेंबर महिन्याचे वेतन फॉरवर्ड करण्यात आलेले होते व यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पगारात महागाई भत्ता देण्यात आलेला नव्हता. परंतु आता हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात दिला जाणार आहे व त्या संदर्भातले परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

त्यानुसार आता माहे डिसेंबर 2023 च्या वेतनामध्ये चार टक्के महागाई भत्ता व त्यासोबत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्याचा महागाई भत्त्यातील फरक सुद्धा देण्यात येणार आहे. सर्व राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै 2023 पासून सुधारणा करण्याबाबत शिक्षण उपसंचालक( प्राथमिक)महाराष्ट्र राज्य, पुणे-01

यांच्याकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग, सर्व, शिक्षणाधिकारी  ( प्राथमिक)जिल्हा परिषद, सर्व महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक( प्राथमिक) यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News