अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-कालपर्यंत पार्डिी तालुक्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून आज परत नगर व आष्टी तालुक्यातील मराठवाडी घाटदेऊळगाव या परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या भागातील जाधव वस्तीवर राहणाऱ्या लोकांना बिबट्या दिसल्याने या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसापासून पाथर्डी तालुक्यातील मढी केळवंडी शिरापूर येथील तीन मुलांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतल्यानंतर
डोंगरमाथा परिसरातील सर्वच गाव वाड्या वस्त्या वरील लोकांच्या मनामध्ये त्याबाबत मोठी भीती निर्माण झालेली असतानाच पाथर्डी तिसगाव आष्टी या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी
जळगाव औरंगाबाद नाशिक येथून विविध पथकांना पाचारण करून आतापर्यंत या पथकांनी डोंगर माता परिसर पिंजून काढत दोन बिबट्यांना जेरबंद केलेले आहे.
असे असले तरी अधून मधून रात्रीच्या वेळी बिबट्या दिसत असल्याची माहिती पुढे येत असल्याने आणखी किती बिबटे डोंगर परिसरात लपून बसलेले आहेत याबाबत ग्रामस्थांसह वन विभाग देखील संभ्रमावस्थेत आहे.
मराठवाडी परिसरातील मायंजी बाबा देवस्थान परिसरात काल बिबट्या दिसल्याने त्या परिसरातील विस पंचवीस लोकांनी सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत या बिबट्याचा पाठलाग करून त्याला पिटाळून लावले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved