अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील भावडी येथील सेवा संस्थेचे उपाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते विठ्ठल भोस यांच्या गट नं १३४ या शेतामधील कांदा पिकावर अनोळखी व्यक्तीने तणनाशक मारल्याने भोस यांचे लाखो रुपये नुकसान केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली.
भावडी गाव ह कमी लोकसंख्या असलेले गाव आहे . या गावात अतिशय टोकाचे राजकारण केले जाते ,त्यातच दि २९ रोजी सेवा सस्थेचे उपाध्यक्ष व भाजपचे युवक कार्यकर्ते विठ्ठल भोस यांनी त्यांच्या मालकीच्या गट न १३४ मध्ये सुमारे २ ते ३ एकर कांदा लागवड केली होती.
कांद्याचे पीक चांगले आले होते. सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने भोस यांच्या विरोधकांने मध्यरात्रीच्या सुमारास तणनाशक पिकावर मारल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या बाबत पोलिस ठाण्यात भोस यांनी तक्रार दाखल केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved