दौंड ते मनमाड हा विभाग पुणे विभागाला जोडला जाणार

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : नुकतेच मध्य रेल यांनी दौंड ते मनमाड हा विभाग सोलापूर विभाग ऐवजी पुणे विभागीत जोडला जाईल, असे आदेश रेल्वे बोर्डचे सचिव अरुणा नायर यांनी दिले.

येते १ एप्रिलपासून हा २२० किलोमीटरचा रेल्वे मार्ग सोलापूर विभागातून पुणे विभागात समावेश करण्यात येणार आहे.

नुकतेच झालेल्या सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य बैठकीत समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी हा विषय मांडला होता.

यापूर्वी देखील अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने सदर विषय वेळोवेळी मानडण्यात आलेले आहे. खासदार सुजय विखे यांच्यासोबत देखील या विषयासंदर्भात चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले होते.

आज पुणे हा अहमदनगर शहराच्या जवळ आहे आणि फक्त १२० किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूर हा अहमदनगर पासून जवळपास तीनशे किलोमीटर लांब असल्याने गैरसोयीचे होते.

यापूर्वी आपले प्रश्न उपस्थित करण्याकरिता व सोडवण्याकरिता प्रवाशांना व प्रवासी संघटनांना सोलापूरला जावे लागायचे असे श्री. मुनोत यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe