धुळ्याच्या पोलिसांकडून महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात धाड टाकत जुगाऱ्यांना केली अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शहरातील पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिक पोलिसांनी काही दिवसांवपूर्वी संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी नगर जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यावर अविश्वास दाखवित थेट धुळ्याहून संगमनेरात पोहोचलेल्या त्यांच्या ‘विशेष’ पथकाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत

दोन तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी छापा घालीत संगमनेरात जोमात सुरु असलेल्या मटका पेढीवर हल्ला चढवला.

या प्रकरणी शहरातील दोघा मटकाबुकींसह एकूण 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक व सुटका झाली आहे. या छाप्यातून पथकाने सुमारे 53 हजारांच्या रोकडसह तब्बल चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी संगमनेरातील मटका बुकी अशरफ समशेरअली जहागिरदार याच्यासह सट्टा घेणारा ताराचंद दत्तात्रय गरगे (वय 30, रा.हॉटेल जयभवानी जवळ, संगमनेर)

व घरमालक निहाल निसार शेख (वय 40, रा.वडगाव पान) यांच्यासह सट्टा लावण्यासाठी आलेल्या अन्य बारा जणांवर मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.या कारवाईने जिल्ह्यातील केवळ अवैध व्यावसायिकच नव्हेतर,

पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. दरम्यान मटका, गांजा, दारु, वाळू, जुगार, गोवंशाची कत्तल अशा सर्वच क्षेत्रातील गुन्हेगारीने गेल्या काही वर्षांत शहर व तालुक्याच्या कानाकोपर्‍यात मोठे बस्तान बसविले आहे.

स्थानिक पोलिसांशी असलेल्या हितसंबंधातून अशा व्यवसायांनी जवळपास तालुका व्यापलेला असल्याने तक्रार करावी तर करावी कोणाकडे अशी स्थिती निर्माण झाली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment