अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी पगारासोबतच बोनस होणार कि नाही याबाबत अनेक ठिकाणी साशंक होते.
मात्र जिल्ह्यातील सोनई मधील मुळा सहकारी कारखान्याच्या कामगारांची दिवाळी आनंदाने द्विगुणित होणार आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांची परतीची ठेव,
ठेवीवरील व्याज आणि कारखान्याच्या कामगारांना बोनस व पगाराची रक्कम मिळून १४ कोटींचे वाटप दिवाळीपूर्वी केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली.
कारखान्याने वीज प्रकल्प उभारण्यासाठी गळीत हंगाम २०१०-२०११ मध्ये गळितास आलेल्या ऊस पेमेंटमधून प्रतिटन ५० रुपयेप्रमाणे कपात केली होती.
सदरच्या ठेवीची मुदत संपत असल्याने ती दिवाळी सणापूर्वी देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला होता. तसेच सभासदांच्या जमा ठेवीवरील व्याज दरवर्षी दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येते.
या प्रमाणे मुदत संपलेली ठेव व जमा ठेवीवरील व्याजाच्या रकमा संबंधित सभासदांच्या बँकखात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष तुवर यांनी दिली. तसेच कारखान्याचे कामगारांची बोनस व पगाराची रक्कमही त्यांच्या बँकखात्यावर वर्ग केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved