अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीनंतर मंदिरे खुली करू, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी कडाकून टीका केली आहे.
देशभरातील मंदिरे सुरू झाली तरीही महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केला आहे.
पार्ट्या चालतात, हळदी-लग्न समारंभ चालतो, हॉटेल, बार सुरू आहेत. मग मंदिरेच बंद का ?असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. लॉकडाऊननंतर पुनश्च हरि ओम म्हणत सरकारने नव्या जोमात सुरुवात केली.
मात्र, ‘हरि’ बंदीवासातच राहीला, अशी टीका मनसेनेही केली होती. या सगळ्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री फेसबूक लाईव्हवर जनतेशी संवाद साधण्यासाठी आले.
मात्र, देऊळे सुरू कधी करणार याचे उत्तर त्यांनी बघू, पाहू दिवाळीनंतर नियमावली करून सुरू करू, असे दिल्याने वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राच्या नरकासुराने राज्यातील मंदिरे बंद करून ठेवल्याने यंदा दिवाळी साजरी करू नये. करायचेच झाल्यास त्यांच्या नावे ‘शिमगा’ करा तसेच आंघोळ करायची आणि गोड खायचे असेल तर या अधर्मी,
नास्तिक असुरांचे चौदावे घालत खा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी ही सर्व मंदिरे बंद आहेत.
मग कोणत्या लक्ष्मीची पूजा करायची? मंदिरे उघडण्यासाठी आपण महाराष्ट्रातील जनतेला पत्राद्वारे दिवाळी बाबत आवाहन केले.सरकारने मनाची नाही तर जनाची लाज ठेवावी. बंडातात्या कराडकर
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved