काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी ‘हे’ करा ; ‘ह्या’ दिल्या सूचना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्याच्या घडीला काँगेस पक्ष मजबुतीकडे लक्ष देण्यात गुंतला आहे. विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून संघटन वाढवण्यात जोर देण्यात आहे. आच धर्तीवर नेवासे येथे तालुका काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुका काँग्रेसचे प्रभारी युवा नेते ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरपंचायतचे प्रभारी बाळासाहेब चव्हाण , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, कार्लस साठे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

यावेळी बोलताना गुजर म्हणाले की, राष्ट्रीय काँग्रेस वाढीसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात, घराघरापर्येंत पक्षाची धेय्य- धोरणे, विचार व आघाडी सरकारच्या योजना पोहोचविणे गरजेचे आहे.

गरीब, सामान्य व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्या. केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी कायद्याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियान राबवावे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment