महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाहनचालकांना करावी लागतेय ‘कसरत’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे.

खासदार, आमदार, मंत्री असताना देखील जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग खुंटला आहे. याचा सर्वाधिक त्रास केवळ आणि केवळ सर्वसामान्य नागरिकास सहन करावा लागतो आहे.

महसूलमंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्‍यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. यातच तालुक्यातील हिवरगाव पावसा गावाला जाण्यासाठी महामार्ग प्रशासनाने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्ग केला आहे.

त्यात रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अपघातांची शक्‍यता निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुका हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या आसपासच्या गावांमध्ये जाण्यासाठी ठिकठिकाणी भुयारी मार्ग, बनवले आहे.

भुयारी मार्गाच्या दक्षिणेकडील बाजूला पुलाखालून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील गटाराचा ढापा फुटून तेथे मोठा खड्डा पडला आहे.

कॉंक्रिटमधील टोकदार लोखंडी सळया वर आल्या असून, खड्ड्यात वाहन गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. समस्या डोके वर काढत असताना देखील प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.

दरम्यान नागरिकांच्या जीवाचा विचार करता या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe