अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यामुळे बससेवा पूर्वरत करण्यात आली आहे.
मात्र अद्यापही काही ठिकाणी बसची संख्या कमी अधिक प्रमाणात असल्याचे जाणवते आहे. तसेच सणासुदीचा काळ जवळ आला असून परगावी जाण्यासाठी पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने ऐन सण उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सध्या घटली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने प्रवाशांची संख्या मात्र वाढत आहे. यामुळे परिवहन मंडळाने पुणतांबे भागात बसची संख्या वाढवावी,
अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय धनवटे यांनी केली आहे. या प्रश्नात कोपरगाव, श्रीरामपूरच्या आगारप्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पुणतांबे या भागातून कोपरगाव, श्रीरामपूर आगाराच्या बस धावतात.
लॉकडाउनमुळे बंद असलेली एसटी बससेवा आता सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, ठराविक मार्गांवरच बस धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
कोरोना रुग्णसंख्येत घट झाली, आठवडे बाजार सुरू झाले, दिवाळी सणामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढली. मात्र, पूर्वी येथे येणारी मुक्काम बस अद्याप बंदच आहे.
सणासुदीच्या काळासाठी जादा बसची गरज असल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved