काेराेनाच्या काळात राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘‘महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. त्यांच्यातील अंतर्गत वादात वर्षभरात सर्व सामान्य नागरीक हा भरडला गेला आहे. काेराेनाच्या कालावधीत या राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

आगामी अधिवेशनात या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारचे आम्ही वाभाडे काढणार आहाेत. पण हे सरकार अधिवेशनाला सामाेरे जाणारच नाही’’, असा घणाघात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘‘राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज बिलाचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न असे सगळे प्रश्न साेडवू शकले नाही. गेल्या वर्षभरात महीलांवरील अत्याच्याराच्या प्रमाणात माेठी वाढ झाली आहे.

काेराेनाची परिस्थिती नीट हाताळली नसल्याने देशांतील एकुण काेेराेनामृत्यूपैकी एक तृतीयांश मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. अतिवृष्टी, निसर्ग वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत मिळाली नाहीत.

मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात टिकविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही, त्याला स्थगिती मिळाली आहे. हे सरकार आम्ही पाडणार नाही तर त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळेच पडेल ’’, अशी टिकाही पाटील यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment