अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली.
सरचिटणीस पदी अक्षय कर्डिले, गणेश कराड यांची निवड करण्यात आली. मात्र या निवडीवरून आता कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरमध्ये जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणीतील निवडीवरून तसे दिसून आले. या कार्यकारिणीत नगर आणि नेवासा तालुक्याला झुकते माप देण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या ध्येयधोरणावर भाजपकडून सातत्याने टीका केल्याचे प्रकार सर्वानी पहिले असतील. विशेषतः काँग्रेसच्या घराणेशाहीवर आवर्जून टीका केली जात असत.
याचीच लागण आता भारतीय जनता पार्टी मध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी जाहीर करण्यात आली यामध्ये ही घराणेशाही दिसून आली आहे.
याप्रकरामुळे काहींनी नाराजी दर्शवली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्षपदी शिवाजी बेरड, अमोल शेलार,
तुषार पवार, उमेश भालसिंग, महेंद्र तांबे, धनंजय मोरे, अमोल गर्जे, संजय कार्ले यांची निवड करण्यात आली. चिटणीसपदी अनिल गदादे, उदय पवार, सचिन पालवे, राजकुमार लोखंडे,
दत्तप्रसाद मुंदडा, अभिजित रोहकले, मच्छिंद्र बर्वे, अभिजित जवादे यांचीच निवड करण्यात आली. प्रसिद्धीप्रमुख – राहुल संभाजी लांडे ,खजिनदार -विवेक भानुदास बेरड यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे : गणेश अशोक झावरे , भाऊसाहेब निवृत्ती खुळे ,प्रभाकर सोपान जाधव ,विकास संभाजी काळे ,सागर बाळासाहेब कल्हापुरे ,
निलेशकुमार साहेबराव दरेकर ,योगेश आदिनाथ कासार ,संजय भाऊसाहेब कदम ,ईश्वर दादासाहेब मुरुमकर ,हरिभाऊ मछिंद्र वायकर ,विक्रमसिह शिवाजीराव जाधव ,सोमनाथ वाखारे ,
गोपिनाथ जगताप ,अमोल बावडकर ,उदय लक्ष्मण शिंदे ,सोमनाथ विष्णुपंत अकोलकर ,राहुल केशरचंद बंब ,पांडुरंग नामदेव मोरे आदीचा जिल्हा कार्यकारणीत समावेश करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved