कोरोनाचे ग्रहण! या देवीचा नवरात्रोत्साव राहणार बंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले आहे. तसेच शासनाने देखील सण उत्सवाच्या पार्शवभूमीवर याबाबतच आवाहन केले आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या देवीच्या नवरात्रीच्या सणवार देखील कोरोनाचे ग्रहण कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कोल्हार येथील साडेतीन शक्ती पिठाचा श्री भगवतीदेवीचा दरबार नवरात्रोत्सावातही बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट व गावक-यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदिशक्तीचा यंदाचा जागर साध्या पद्धतीने होणार असल्यामुळे भाविकांमधील नवरात्राचा दरवर्षीचा उत्साह मावळला आहे. यावर्षी फक्त देवीची पारंपारिक घटस्थापना पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी केले जाणार आहेत.

ते सुधा मंदिरातील सेवेकरी व पुजारीच करतील अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश राहणार नाही. आरतीच्या वेळी मंदिराच्या परिसरात गर्दी करता येणार नाही.

देवीचे दर्शन घेण्यासाठी गाभा-यापर्यंत प्रवेश मिळणार नाही. त्याऐवजी होमकुंडाजवळील प्रवेशद्वाराजवळ देवीच्या पादुकांवर माथा टेकविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

मंदिर परिसरात खेळणीचे, प्रसाद, पूजा साहित्य, खाद्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने व इतर कोणतीही नवीन दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणूनच सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देवालय ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment