अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले असून, २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता चक्क ७० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे.
राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम तालुक्यात कांद्याच्या बियाणास व रोपांना मोठी मागणी वाढली आहे.
त्यामुळे तालुक्यात कांदा बियाणांच्या व रोपांच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी बोगसबियाणे विकणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची शक्यता आहे.
मात्र यंदा तालुक्यात नुकतीच झालेली अतीवृष्टी व सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक वाया गेले आहे. तसेच कांदा लागवडीसाठी टाकेली कांदा रोपेही जळून गेली आहेत.
त्यामुळे दोन हजार रूपये प्रती किलो असणारा कांदा बियाणाचा बाजारभाव थेट चार हजार किलो झाला आहे. त्याचा परिणाम मात्र अता अनेक ठिकाणी बोगस बियाणांची विक्री सुरू झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची शक्यात निर्माण झाली आहे. या कडे कृषी अधिकारी व इतरांनी लक्ष घालावे अशी मागणी जागृक शेतक-यांमधून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved