अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात महामार्गावर लुटीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
शेवगाव – बोधेगाव रस्त्यावर बाभुळगाव फाट्यावर दुचाकीवर चाललेले रविंद्र संपत खलाटे व त्यांच्या पत्नी यांना रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी अडवले.
आरोपींनी या जोडप्याला चाकूचा धाक दाखवून भोसकण्याची धमकी देऊन महिलेजवळील सोन्याचे दागिने व पतीजवळील रोख रकम व मोबाईल हँण्डसेट असा ५० हजाराचा ऐवज लुटून नेला.
या प्रकरणी रर्विद्र संपत खलाटे या इसमाने शेवगाव पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चौघा आरोपोंविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस निरीक्षक ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गोरे हे पुढील तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved