भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- आदर्श पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून अखेर पेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फियार्द दिली आहे. दरम्यान दि. ३१ जानेवारी रोजी मोहा येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात पेरे पाटील यांनी पत्रकारांना हलकट, हरामखोर असे अपशब्द वापरले होते.

तेव्हा जामखेडमधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत याचा निषेध केला होता. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment