संगमनेरात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींना अभिवादन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना 36 व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर कार्यस्थळावरील शक्तिस्थळ बाग येथे काँग्रेसपक्षाच्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाच्या कडून आज 31 ऑक्टोबर 2020 रोजी 10 वाजता पुष्पांजली वाहण्याचा व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय.

यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी माजी पंतप्रधान स्व .इंदिराजींच्या जीवन कार्यावर व्याख्यानमालेतून देशासाठी स्व.इंदिरा गांधींचे योगदान हे मोलाचे आहे.

त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील असेच आहे असे विवेचन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केलेय. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहळ, व्हा. चेअरमन संतोष हासे,

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,लक्ष्मणराव कुटे,रामदास वाघ,सुरेश थोरात, भरत मुंगसे,नवनाथ अरगडे आदींसह विविध संस्थाचे पदधिकारी ,संचालक मंडळ ,कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार प्रदर्शन कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment