गौरी प्रशांत गडाख यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला ‘हा’ प्रश्न !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांच्या आकस्मित मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

गौरी प्रशांत गडाख असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या गौरी यांचे माहेर जिल्ह्यातीलच राहाता तालुक्यातील लोणी हे असून त्या विखे कुटूंबाच्या नात्यातील असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी नगरमध्ये धाव घेतली. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात गौरी यांच्या मृत्यू बद्दल शंका व्यक्त करत गडाख कुटुंबाबद्दल काही आरोप केले आहेत.

गौरी यांनी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आत्महत्या केल्याचे कळते, माहेरच्या नातेवाईकांनी घटना दुपारी होऊनही संध्याकाळ पर्यंत आम्हाला का कळवले नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe