अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला. यातून सावरत नाही तोच जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूचे संकट उभे राहिले.
या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही पोहचली आहे. त्यातच आता लाळ्या खुरकत लसीकरण अद्यापपर्यंत सुरू न केल्याने पशुपालक पुन्हा अडचणीत आलेला आहे.
आधीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या पशुपालक शेतकर्यांचा अंत पाहू नका, अन्यथा सर्व जनावरे दवाखान्यात आणून सोडले जातील,
असा इशारा युवा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले यांनी दिला आहे. पशुसंवर्धन विभागाने या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर हा लसीकरण कार्यक्रम करावा.
यावर्षी केंद्र सरकारने प्रत्येक पशुची गणना व प्रत्येक पशुला टॅगींग करुनच एफ.एम.टी.चे लसीकरण करावे,
अशा सूचना केल्याने आता आधीच उशीर झालेल्या लसीकरणाला टॅगींगचा खोडा घातल्यामुळे लसीकरण करणार्या यंत्रणेवर ताण आल्याशिवाय राहणार नाही.
या सर्व प्रक्रियेत शेवटी लाळ-खुरकत डोकं वर काढण्याची भीती नवले यांनी व्यक्त केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved