गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

Published on -

पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते

शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती.

गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

साधं राहणीमान असलेले मनोहर पर्रिकर यांनी स्वच्छ प्रतिमेमुळे गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला.

वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात पर्रिकर यांनी मात्र आपल्या कुशल नेतृत्वाने ही अस्थिरता संपुष्टात आणली. मुख्यमंत्री म्हणून पर्रिकर यांनी गोव्याला यशस्वी नेतृत्व दिलं. 


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe