अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गेल्या वर्षी देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते.
या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील भीमा नदीला आलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या होत्या. भांबोरा, दुधोडी, जलालपुर, बेर्डी, देऊळवाडी, सिद्धटेक, गणेशवाडी,
खेड या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी एक लाभदायक माहिती आणली आहे.
आ. पवारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेत पिकांचे पंचनामे करण्याच्या सुचना महसुल विभागाला दिल्या होत्या.
या पंचनाम्यात ८ गावातील ७९६ शेतकऱ्यांच्या ४१६.२० हेक्टर क्षेत्रासाठी शासनाकडून १ कोटी ६८ लक्ष रक्कम मंजुर करण्यात आली. सध्या त्यातील निम्मी म्हणजेच ८६ लक्ष रक्कम कर्जतच्या महसुल विभागाकडे वर्ग झालेली आहे.
आता ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर बँक पासबुक, आधार क्रमांक या कागदपत्रांची पुर्तता करून वर्ग करण्यात येणार आहे.
उर्वरीत रक्कमही लवकरात लवकर कशी मिळवता येईल यासाठी आमदार रोहित पवारांचे प्रयत्न सुरू आहे. गावांची नावे व शेतकऱ्यांची संख्या
- भांबोरा : २४५
- दुधोडी :१३३
- जलालपुर : १५७
- बेर्डी : ९७
- देऊळवाडी : ३४
- सिद्धटेक : ८१
- गणेशवाडी : ४२
- खेड : ७
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved