अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.
या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. देशातील सर्व जनतेला कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणारी लस मोफत मिळेल, असं केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केलं आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर सरकार 500 रुपये खर्च करणार असल्याचं प्रताप सारंगी यांनी म्हटलं आहे. सर्व जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं असल्याचं सारंगी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कोरोना लसीबाबत चर्चा केली होती. भारतातील वैज्ञानिक लस बनवण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच ही लस तयार होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved