खुशखबर! जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा दर वाढला…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा दरामध्ये कमालीची घट झालेली पाहायला मिळते आहे.

त्यातच एक दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरीचा रेट हा चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली असून, हा दर 89.86 टक्के आहे.

आतापर्यंत 39 हजार 562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आज 724 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 744 इतकी झाली आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:39562

उपचार सुरू असलेले रूग्ण:3744

मृत्यू:722 एकूण रूग्ण संख्या:44028

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment