अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दुष्काळ व चालू वर्षातील कोरोना महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन जिल्हयातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतला आहे.
त्यात कर्जदार शेतकरी सभासदांना तीन लाख रुपये कर्ज शूून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.
या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, व्हाईस चेअरमन रामदास वाघ व संचालक शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.
योजनेबाबत जिल्हयातील शेतकऱ्यांना व्याज सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे तक्रारी आल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत हे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे.
दरम्यान कोरोना संकटाच्या काळात शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved