आनंदाची बातमी : पुणे- नागपूर मार्गावर धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’; कधी सुरु होणार? वेळ किती लागणार? वाचा

Published on -

नागपूर-पुणे रेल्वेमार्ग हा सर्वात व्यस्त रेल्वेमार्ग समजला जातो. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावेल, अशी आशा व्यक्त केली. या मार्गावर वंदे भारत सेवा सुरु करण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचंही मंत्री वैष्णव यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. तेव्हापासून ही रेल्वे कधी सरु होईल? कधीपर्यंत काम होईल? हे प्रश्न विचारले जात आहेत.

वंदे भारतची गरज काय?

पुणे आणि नागपूर ही दोन्हीही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरांत जाण्यासाठी सध्या 14 ते 16 तासांचा कालावधी लागतो. या मार्गावरील रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये गर्दी खूप असते. या दोन्ही शहरांतील प्रवासाचा वेळ वाचला तर महाराष्ट्राच्या प्रगतीत वेगाने होईल, असे काहींचे म्हणणे आहे. हीच गरज लक्षात घेऊन या मार्गावर वंदे भारत सुरु करण्याची मागणीही बऱ्याच काळापासून होत आहे.

किती वेळात होणार प्रवास?

सध्या या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 14 ते 16 तास आहे. या मार्गावर वंदे भारत सेवा सुरु झाली तर, हाच वेळ 3 ते 5 तासांपर्यंत येईल. म्हणजेच अर्ध्याहून कमी वेळात वंदे भारत ट्रेन पुणे-नागपूर अंतर कापेल. या ट्रेनमधील आसन व्यवस्था, वक्तशीरपणा, सोयी-सुविधांचा विचार करता या मार्गावरील सेवेला प्रतिसाद मिळेल असं सांगितलं जात आहे.

कधी सुरु होणार?

पुणे- नागपूर वंदे भारत ट्रेन नेमकी कधी सुरु होणार याबद्दलची कोणतीही ठोस तारीख आणि माहिती समोर आलेली नाही. परंतु मंत्री आश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री स्वतः नागपूरचे असल्याने ते या प्रोजेक्टला हिरवा कंदील देतील व लवकरच हे काम सुरु होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe