वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून ते प्रत्येक वाहन धारकाकडे असणे खूप गरजेचे आहे. आपल्याला माहीत असेलच की नवीन ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहतूक परवाना जर काढायचा असेल तर याची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची व अवघड असल्यामुळे बरेच जण ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकडे दुर्लक्ष करतात.
यामध्ये कागदपत्रांची पूर्तता तसेच भरावे लागणारे विविध प्रकारचे फॉर्म यामुळे बरेच जण त्रस्त होतात. तसेच या प्रक्रियेमध्ये पैशाच्या देवाण-घेवाण होऊन गैरव्यवहार होण्याची देखील शक्यता वाढते.
या सगळ्या समस्या समोर ठेवून आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहेच.परंतु त्यासोबत आता एक जून पासून ड्रायव्हिंग लायसन्स चे जे काही नियम आहे त्यामध्ये देखील बदल केले जाणार आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स नियमांमध्ये एक जून पासून होणार बदल
1- सध्याची जर आपण प्रक्रिया पाहिली तर या करता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयमध्ये वैयक्तिकरित्या जाऊन त्यासंबंधीची परीक्षा द्यावी लागते. परंतु आता या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून नवीन नियमानुसार अर्जदार हे त्यांच्या पसंतीचे आणि सर्वात जवळचा केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहेत.
एखाद्या खाजगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेमध्ये पास झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत व या प्रमाणपत्राच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे मॅनेजमेंट करू शकणार आहेत.
2- ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल अशा वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. अशा वैध ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांना दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो व एवढेच नाही तर एखादा अल्पवयीन चालक सापडला तर 25 हजार रुपयांचा दंड आणि त्याच्या पालकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे व वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र देखील रद्द केले जाऊ शकते.
3- कोणत्या प्रकारच्या परवान्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत याची यादी आता अर्जदाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याकरिता जे काही कागदपत्रे लागतात त्यामध्ये देखील सुलभता येणार आहे.
4- महत्वाची गोष्ट म्हणजे अशा काही नियमांमध्ये बदल करण्यात आले असले तरी देखील ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मात्र पूर्वीसारखेच ठेवण्यात आलेली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन परवाना संबंधीच्या शुल्कामध्ये बदल
1- शिकाऊ परवाना अर्ज 3 करिता 150 रुपये शुल्क लागेल.
2- शिकाऊ परवाना चाचणी शुल्कासाठी पन्नास रुपये शुल्क लागेल.
3- ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क तीनशे रुपये लागेल.
4- ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी दोनशे रुपये शुल्क लागेल.
5- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क लागेल.
6- परवान्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडायचा असेल तर पाचशे रुपये शुल्क लागेल.
7- परवान्याचे नूतनीकरण करायचे असेल तर दोनशे रुपये शुल्क लागेल.
8- ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तीनशे रुपये अधिक एक हजार रुपये असे तेराशे रुपये चार्ज लागेल.
9- ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्शन स्कूलसाठी डुप्लिकेट परवाना जारी करायचा असेल तर पाच हजार रुपये इतके शुल्क लागेल.
10- परवाना प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध आवाहन करणे( अपील करणे पाचशे रुपये शुल्क लागेल )
11- परवाना वरील पत्ता बदलायचा असेल तर दोनशे रुपये शुल्क लागेल.