अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- शहरातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या राज चेंबर्स या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत.
येथे गांजा, दारु पिऊन सर्वसामान्य व्यावसायिक व नागरिकांना त्रास देणार्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होतोय. त्यांचा बदोबस्त करण्याची मागणी राज चेंबर्स येथील व्यावसायिकांनी

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज चेंबर्सच्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन या संदर्भात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याशी चर्चा केली.
संजय नावंदर, नरेंद्र पटेल, बी. अनिल, मुनाफ बागवान, आर.बी. मल्होत्रा, ए.एस. अमजद, अन्सार सय्यद, जावेद शेख उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved