अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा पार्दुर्भाव झपाट्याने वाढत असताना कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रित कशी आहे?
हे जनतेसमोर स्पष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दररोज 800 ते 900 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. रुग्णाचा उच्चांक गाठला जात असताना
शहरातील अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांचे मृतदेह अत्यसंस्कार करण्यात येतात. त्या ठिकाणी हवी तेवढी सोयीसुविधा नाही. जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
मध्यंतरी कोरोना चाचणी करण्यासाठी दोन दिवस स्वॅब घेतले जात नव्हते. जिल्हा रुग्णालयात प्रशासनाची अपुरी मदत असल्याने त्या ठिकाणी हवा तेवढा वचक कुणाचा नाही.
त्याठिकाणी कोरोना रुग्णांना अतिशय वेदनादायक परिस्थितीत राहण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना दुसर्या आजारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही.
त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविले जात आहे. रोज 20 ते 25 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडत आहे.परंतु प्रशासन खोटे आकडे जनतेसमोर सादर करत आहे.
ज्या शववाहीकेतून मृतदेहांना घेऊन जातात त्या शववाहिकेची क्षमता 10 जणांची आहे. परंतु एकाच वेळी 15 ते 18 मृतदेहांना त्याठिकाणी अतिशय भयानक अवस्थेत शववाहिकेत कोंबून पाठविले जाते.
तरी अहमदनगर शहर व जिल्हा नियंत्रित कसे काय? स्वतःच्या मतदारसंघात जनता कर्फ्यू करण्यात आला. शहरात बरेच सामाजिक संघटना व जनतेची मागणी असताना जनता कर्फ्यू करण्यात आला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असताना ही परिस्थिती नियंत्रित कशी आहे? हे जनतेसमोर स्पष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी पालकमंत्रीकडे मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved