ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय करणारा मी माणूस नाही. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य असते.

त्यामुळे समाजाचे प्रश्न, मागण्या यासाठी मी नेहमी पाठपुरावा करेन, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिले.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित एका अनौपचारिक कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, पुणे शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,

भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर आदींसह ब्राह्मण महासंघाचे राज्याच्या विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ब्राह्मण समाजाकडून मला नेहमीच प्रेम मिळाले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना परिषदेचे संस्थापक बाळ आपटे आणि यशवंतराव केळकर यांच्या कुटुंबाचा मला नेहमीच स्नेह मिळाला