पक्षात फूट पडली कि नाही हे मला माहीत नाही – आमदार नीलेश लंके

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून विजयी झालो असून पक्षाबरोबरच राहणार आहे. पक्षात फूट पडली किंवा नाही हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी पक्ष मजबूत असून पक्षाच्या बैठकीस आपण उपस्थित राहणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातम्या दूरचित्रवाहिनीवर सुरू झाल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शरद पवार यांना मानणारा मोठा गट असून अजित पवार यांच्या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त होऊ लागली होती.

राष्ट्रवादीचे आमदारलंके यांच्या काही उत्साही समर्थकांनी लंके हे मुंबईत असल्याच्या, तसेच त्यांचा फोन बंद असल्याच्या वावड्या उठवल्याने गोंधळात आणखी भर पडली. लंके हे अजित पवार यांच्या गोटात असल्याच्या बातम्या प्रसारीत होऊ लागल्यानंतर आमदार लंके नामदार होणार असल्याच्या पोष्टही काही जबाबदार कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर पसरवल्या.

राज्यात राजकीय भूकंपाची स्थिती असताना व आमदार लंके यांच्याविषयी उलटसुलट बातम्या येत असताना लंके मात्र तालुक्यातच होते. त्यांचा फोनही सुरू होता. लंके हे अजित पवार यांच्या गोटात गेल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेकांनी त्यांना फोन करून चौकशी करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी लंके यांनी स्वतः खुलासा करत पक्षात पडलेल्या फुटीबाबत आपण अनभिज्ञ आहोत. माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकनिष्ट आमदार असून कोणत्याही स्थितीत पक्षावरील निष्ठा सोडणार नाही, असे त्यांची स्पष्ट केले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment