पक्षांतर मनावर घ्यायचे नसते  : पाचपुते

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- पक्षांतरासारख्या गोष्टी राजकारणात होत असतात. त्या फारशा मनावर घ्यायच्या नसतात.  

नगर मधून काहीजण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. हे केवळ आपल्या कामाचे अपयश झाकण्यासाठीचा तो प्रकार आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

नगरमधून आगामी काळात एखादा नेता, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची सुतराम शक्यता नसल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे  अतिवृष्टिने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आ. पाचपुते यांच्या पुढाकारात भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भोसले यांची भेट घेतली. या वेळी आ. पाचपुते म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

श्रीगोंदे तालुक्यात १८० टक्के पाऊस झाला. हीच परिस्थिती जिल्ह्यात आहे. या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe