अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करून सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे फळ आपणास आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही.
पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते कर्जत येथे गाव तेथे काँग्रेस आणि वार्ड तेथे काँग्रेस कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, नूतन जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, अॅड. कैलास शेवाळे, कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक सचिन घुले, अॅड. माणिकराव मोरे, ज्योती गोलेकर,
जामखेडचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, श्रीगोंद्याचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, शंकर देशमुख, दादासाहेब कानगुडे, बापूसाहेब काळदाते, रूपचंद पोटरे, जिल्हा बँकेच्या संचालिका मिनाक्षी साळुंके,
नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहिनी घुले आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नूतन जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे,
तालुकाध्यक्ष किरण पाटील, कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक सचिन घुले, राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख आदींची यावेळी भाषणे झाली. युवकचे अमोल भगत, रामराजे जहागीरदार, माजिद पठाण,
भास्कर भैलुमे, मिलिंद बागल, अमोल कदम, संदीप धांडे आदी उपस्थित होते. यावेळी कर्जत शहरातील प्रभाग निहाय पदाधिकाऱ्याच्या निवडी पार पडल्या.
मागील काळात नगर काँग्रेस गटातटात विखुरलेली होती. सध्या ती एकसंध आहे आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.
त्यामुळे उद्या त्यांना तिकडे मानपान न मिळाल्यास इकडे काही घेऊ नका, असा टोला मनोगतामध्ये जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी विखे यांचे नाव न घेता लगावला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved