अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- आमदार रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील दयनीय अवस्था झालेल्या
मिरजगाव येथील नगर-सोलापूर रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी व्हिडिओ क्लिपवर दिला.
आमदार पडळकर सकाळी साडेसात वाजता नगर-सोलापूर रस्त्याने औरंगाबादकडे चालले असताना मिरजगाव येथे काही वेळ थांबले होते. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
नगर-सोलापूर रस्त्याची दुरवस्था पाहून त्यांनी ‘हाच का रोहित पवारांचा विकास?’ असे म्हणत रस्त्याचे चित्रीकरण करत पवार यांच्यावर टीका केली.
रोहित पवार हे शरद पवार यांच्या खांद्यावर उभे राहून देशाच्या नेतृत्वाला सल्ले देत आहेत. त्यांनी खाली उतरुन आपली उंची मोजावी. आपलेच सरकार असल्याने मतदारसंघातील रस्ते तरी दुरुस्त करावेत, असे पडळकर यावेळी म्हणाले.
पडळकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सर्वच टीव्ही चॅनेलवर त्याची बातमी प्रसारित झाल्याने मिरजगावातील खराब रस्ता राज्यात गाजत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved